Nilesh Rane | ‘साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार’, निलेश राणेंची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर काल (गुरुवार) आयकर विभागाने छापे (Income tax department raid) टाकले. याशिवाय साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Factory) देखील छापा टाकला. दरम्यान पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नरीमन पॉईंट येथील कार्यालयावर आयकर विभागाची दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरु आहे. पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांच्या संबंधित लोकांच्या 40 रहिवाशांच्या आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यावर भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रीय दिली आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधताना या जन्मातच भरपाई करावी लगेल असे म्हटले आहे.

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर अजित पवार यांनी म्हटले होते की, याआधी केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा विचार जनतेने केला पाहिजे, असे अजित पवार म्हटले होते. यावर साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे.

 

शरद पवारांनी (Sharad Pawar) उलटा नियम लावून शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने उद्योगपतींच्या नावाने केले. शेतकऱ्यांचे कारखाने उद्योगपती आणि पवार कुटुंबियांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे. त्यांच्या उपजिविकेचे साधन काढून घ्यायचे, असे म्हणत असल्याचा तक्रारदार माणिकराव जाधव (Manikrao Jadhav) यांचा व्हिडिओ निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

माणिकराव जाधव यांचा व्हिडिओ पोस्ट करताना नितेश राणे यांनी म्हटले,
पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले हे पुरावे सहित यंत्रणांकडे पोहोचलेलं आहे.
हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल,
ही तर सुरुवात आहे. साखरेच्या नावावर महाराष्ट्राला (Maharashtra) लुटलं,
तिच साखर पवार कुटुंबाला (Pawar family) संपवणार, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Web Title :- Nilesh Rane | income tax officials raided companies ajit pawar relatives nilesh rane reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Ambabai Temple | अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी सासऱ्यासह जावयाला ठोकल्या बेड्या

Pune Crime | 83 लाख रुपये घेऊनही विवाहितेचा छळ, महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

ACB Trap on Sujata Patil | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात