बाळासाहेबांच्या स्मारकावरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे हे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागणार अशी खोचक टीका निलेश राणे यांनी ट्विटरवरुन केली आहे.

‘युतीची शोकांतिका! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना’ ह्या बातमीची लिंक ट्विटरवर शेयर करत निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की , ‘ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागेल. ‘

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची सत्ता असणाऱ्या औरंगाबाद महापालिकेने त्यांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तब्बल १७ एकर जागेत ९३ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४८ कोटींची निविदा काढली आहे. पण ती निविदा एकाही ठेकेदाराने भरलेली नाही. किंबहुना एकही ठेकेदार त्यासाठी उत्सुक नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like