Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Rane | वादग्रस्त ठरलेल्या आणि भूमीपूत्रांचा विरोध असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या प्रकल्पाला पुन्हा जोरदार विरोध होऊ लागला आहे. प्रकल्पाचे सर्वेक्षण बारसू येथील माळरानावर सुरु असल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांनी निलेश राणे (Nilesh Rane) यांचा ताफा अडवल्यानंतर राणे समर्थकांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. या प्रकारानंतर निलेश राणे यांनी म्हटले की, जर आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो.

 

नाणार प्रकल्पाला विरोधात आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांना शिवीगाळ झाल्याने ते संतापले. यानंतर निलेश राणे यांनी मध्यस्ती करत ग्रामस्थांची समजुत काढली आणि माफी मागितली. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी म्हटले की, तुम्ही जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल.

 

निलेश राणे पुढे म्हणाले की, तुम्ही शिविगाळ केल्याचा आरोप करत आहात,
जर कोणी तुम्हाला शिवीगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो.
तसेच आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत.
मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो. त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा.

 

Web Title :- Nilesh Rane | nilesh rane apologized to people who oppose nanar refinery project

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Accident In Tamhini Ghat | ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू; तर 3 जण गंभीर जखमी

 

Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या चंदननगर परिसरात युवकाचा गोळ्या झाडून खून

 

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे-पाटलांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण