Nilesh Rane | भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आता निलेश राणेंचीही टीका, म्हणाले – पवार साहेबांसोबत असणार्‍यांना समजणार नाही…

मुंबई : Nilesh Rane | मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शाळेत देवी-देवतांचे फोटो लावण्यावरून एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा भाजपा (BJP) आणि काही ब्राह्मण संघटनांकडून (Brahmin Organization) निषेध करण्यात येत आहेत. आता नारायण राणे (Narayan Rane) यांचे पूत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, नोटांवर पण फक्त गांधीजी कशाला, सगळे महापुरुष पाहिजे. हिंदू धर्मामध्ये पारंपारिक श्रद्धेला वेगळे महत्त्व आहे. पण, ते पवार साहेबांच्या सोबत असणार्‍यांना समजणार नाही. हे वाक्य ओवेसी बोलण्यासारखे आहे.

मुंबईतील भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनीही भुजबळांवर टीका करताना म्हटले आहे की,
आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील. मंदिरे कशाला हवीत.
ती पाडून टाका असंही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? हिंदु देवी देवतांचा अपमान राष्ट्रवादीने केला आहे त्यांनी माफी मागायला हवी.

दरम्यान, आज मुंबईत अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळ म्हणाले होते,
शाळेत (Savitribai Phule), महात्मा फुले (Mahatma Phule), छत्रपती शाहू महाराज
(Chhatrapati Shahu Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar),
कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmveer Bhaurao Patil) फोटो लावा.
सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिले नाही, ज्यांनी आपल्याला शिकवले नाही.
असेलच शिकवले तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले, त्यांची पूजा कशासाठी करायची?

Web Title :- Nilesh Rane | nilesh rane on chhagan bhujbal those who are with sharad pawar will not understand nilesh ranes criticism on bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा! निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नाही; कोर्टाचा निर्णय

Amol Mitkari | ते बंडखोर 16 आमदार अपात्र ठरणार का?, सर्वत्र चर्चा सुरू असताना अमोल मिटकरींचे सूचक ट्विट,…तर शिंदे सरकार दसर्‍यापूर्वीच कोसळेल