Nilesh Rane On Nawab Malik | ‘दाऊदचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात’; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nilesh Rane On Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ED ने अटक केल्यापासून पुन्हा एकदा डॉन दाऊदचं (Don Dawood Ibrahim) नाव चर्चेत आलं आहे. नवाब मलिक यांचे दाऊदसोबत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी (Money Laundering) संबंध असल्याचं ईडीने म्हटलं आहे. नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतलं असून त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी आहे. मात्र दुसरीरडे भाजपने आक्रमक पवित्रा घेत मलिकांची मंत्रीमंडळातून (Cabinet) हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. मात्र अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल भावात जमीन खेरदी केली. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवणाऱ्यांकडून तुम्ही जमीन खरेदी (Land purchase) करता, यामुळे दाऊदचा खरा फ्रंट मॅन (Front Man) नवाब मलिक असू शकतात, असा खळबळजनक दावा निलेश राणे यांनी केला आहे. त्यासोबतच त्यांनी पवार कुटुंबियांवरही जोरदार टीका केली. (Nilesh Rane On Nawab Malik)

 

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा अत्यंत जवळचा माणूस नवाब मलिक यांचा दाऊदची फ्रंटम्रन हसीन पारकरच्या (Hasina Parkar) माध्यमातून थेट दाऊदशी येतो ही गंभीर बाब आहे.
अशा माणसाला शरद पवार यांनी थारा द्यायला नको.
इतकं सगळं होऊनही राष्ट्रवादी काय करत आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे.
ही गोष्ट शरद पवार यांनीही लक्षात घ्यायला हवी, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिकांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) काही बोलत नाहीत.
यावरून लक्षात येतं की ते या प्रकरणाला किती गांभीर्याने घेता, असं म्हणत राणेंनी पवार कुटुंबाला (Pawar Family) धारेवर धरलं.

 

Web Title :- Nilesh Rane On Nawab Malik | nilesh rane slams maha vikas aghadi government over nawab malik arrested by ed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का