Nilesh Rane on Sanjay Raut | ‘सामना’तील कष्टातून…? राऊतांना निलेश राणेंचा सवाल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Rane on Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग (Alibag) आणि दादर (Dadar) येथील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर, आपण कष्टाने कमावलेली संपत्ती ईडीने जप्त केली असल्याचं संजय राऊत म्हणाले. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत (Nilesh Rane on Sanjay Raut) यांना एक सवाल केला आहे.

 

संजय राऊत नेमकं कसले कष्ट करतात ? रोजरोज महागडे कोट घालून फिरतात इतक्या जमिनी त्यांच्या नावावर आहेत. मेहनतीचं वगैरे राऊतांनी बोलूच नये. मग ‘सामना’तील (Saamana) कष्टातून इतकी कमाई त्यांनी केलीय का ?, असा सवाल संजय राऊतांना निलेश राणेंनी केला आहे.

 

इतक्या वर्षांपासून जो काही काळा पैसा (Balck Money) संजय राऊतांनी कमावला आहे. तो कधी ना कधी बाहेर येणारच होता, असं म्हणत निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे राऊतांवरच्या कारवाईमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राऊतांच्या कार्यालयाबाहेर गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे.

 

दरम्यान, राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊन कारवाया केल्या जातात हे पाहिलं.
आमचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं. भाजपचे (BJP) लोक उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत.
मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे.
असंच करत राहिलं पाहिजे कारण यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असं राऊत म्हणाले.

 

Web Title :- Nilesh Rane on Sanjay Raut | nilesh rane reaction on ed takes action shiv sena leader sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा