Nilesh Rane On Sharad Pawar | ‘पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा’ – निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Rane On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी एसटी कामगारांनी (ST Workers Strike) गोंधळ घातला आहे. यावेळी एसटी कामगारांनी (MSRTC) शरद पवार यांच्या घर परिसरात चप्पल आणि दगडफेक सुरू केल्याने आंदोलन चिघळल्याचे दिसते आहे. आज एसटी कामगार चांगलेच आक्रमक होताना दिसले. त्यावेळी न्यायालयाचा निकाल मान्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. या परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचे कामगार म्हणत आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. दरम्यान भाजपचे (BJP) माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nilesh Rane On Sharad Pawar)

 

”काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा,” अशा शब्दात निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

 

दरम्यान, न्यायालयाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं एसटी कामगारांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकर न होण्यामागचे सूत्रधार असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी कामगारांचा संप चिघळला आहे.

Web Title :- nilesh rane advice to sharad pawar


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतिय टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

 

Insulin Plant For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांना इन्सुलिन देते ही वनस्पती, केवळ 1 पान चावल्याने कंट्रोल होईल Blood Sugar

 

Sharad Pawar | ‘शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना सोडणार नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

 

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो