Nilesh Rane On Uddhav Thackeray | ‘आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा’; भाजप नेते निलेश राणेंचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Rane On Uddhav Thackeray | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. एकनाथ शिंदेसह पस्तीस ते चाळीस आमदार सध्या गुवाहटीमध्ये आहेत. भाजपसोबत (BJP) युती करा असं एक आव्हानच शिंदे गटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. अशातच अनेक राजकीय घडामोडींवर तर्क वितर्क लढवले जात आहेत. यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. (Nilesh Rane On Uddhav Thackeray)

 

निलेश राणे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी सध्या शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांच्या आकडेवारीवरून शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेपेक्षा अधिक आमदारांची संख्या सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहे. त्यामुळे शिवसेनेकडील आमदारांची संख्या पाहता, शिवसेनेने आता IPL टीम सुरु करावी, अशी जोरदार टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्याचबरोबर, पक्ष चालवणं हे उद्धव ठाकरेंचं काम नाही, असे म्हणत त्यांनी टीमसाठी त्यांनी नावही सुचवलं आहे. (Nilesh Rane On Uddhav Thackeray)

 

“शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा.” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्याच रात्री राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारं बंड शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी पुकारले. एकनाथ शिंदे हे 20 -22 आमदारांसोबत सूरतला दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी सूरतमध्ये घडलेल्या सर्व राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदेंसह जवळपास 35 ते 40 आमदारांना गुवाहटीला हलवण्यात आले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 45 आमदारांचा पाठिंबा आहे असं एकनाथ शिंदेंचा दावा आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.

 

Web Title :- Nilesh Rane On Uddhav Thackeray | ‘Now, form an IPL team with 11-12 Shiv Sena MLAs’; BJP leader Nilesh Rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

 

Constipation | बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का?, मग या ३ पदार्थांपासून दूर राहा अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल!

 

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून मोठ्या कारवाईला सुरुवात