‘हा’ फोटो ट्विट करत अवघ्या 3 शब्दांत निलेश राणेंनी साधला आदित्य ठाकरेंवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीदरम्यान राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. सोबतच निलेश राणे यांना एका फोटोच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती पडद्याआड लपून पहात असल्याचे दिसत आहे. निलेश राणे यांनी फोटो शेअर करताना, आदित्य यांची सध्याची परिस्थिती अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान निलेश राणे यांनी दुसरे ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचे दावे केले जात आहेत. याप्रकरणी कोणीही जाहीर भाष्य केलेलं नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचं नाव जोडणाऱ्यांना हिंमत असेल तर जाहीरपणे नाव घ्यावं असं आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत बाजू मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरे यांच्यावर मोजक्या शब्दांत निशाणा साधला आहे.

अन्य एका ट्विटमध्ये निलेश राणे यांनी, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागेल असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले…की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे, असं ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे.

 

ttps://twitter.com/meNeeleshNRane/status/1293242557455949825