Nilesh Rane | ‘…म्हणून वैभव नाईक शिवसेनेत’, निलेश राणेंचा गौप्यस्फोट (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षात मोठे बदल केले. सिंधुदुर्गमध्ये मोठे फेरबदल करताना आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले. यानंतर जिल्ह्यात नव्या नियुक्त्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात (Shinde Group) जाणार असल्याची चर्चा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु आहे. यावर माजी खासदार आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसेच वैभव नाईक आणि निष्ठा याचा काहीही संबंध नसल्याची टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे.

वैभव नाईक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उत्तर देताना, मी नवीन पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले आहेत. मी उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. यानंतर निलेश राणे यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत वैभव नाईक यांनी निष्ठेच्या गोष्टी करु नयेत. तसेच नाईक हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटले असून अनेक कामे त्यांनी करुन घेतलीत, याबद्दल त्यांनी खुलासा करावा असा गौप्यस्फोट निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुलासा करताना म्हणाले, शिवसेना पक्षप्रवेशाबद्दल
जेव्हा वैभव नाईक यांना विचारणा केली असता, राणेंचे काय? जर कुडाळ-मालवण मधून राणे निवडणूक लढवणार
नसतील, किंवा मला मतदारसंघातून तिकीटाची खात्री देत असाल तर मी 100 टक्के तुमच्याकडे येतो,
हे वैभव नाईकांनी बोललंय का नाही, हे कोणत्याही मंदिरात येऊन सांगावं.
जिथ बोलवाल तिथं देवावर हात ठेऊन सांगावं की ही चर्चा झाली का नाही, असे म्हणत राणे यांनी गौप्यस्फोट केला.
तसेच स्वत:चं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, उद्धव ठाकरेंशी त्यांना काहीही घेणं-देणं नाही.
आम्ही काँग्रेसमध्ये गेलो म्हणून तो शिवसेनेत आहे. अन्यथा याचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे निलेश राणे यांनी म्हटले.

Web Title :-  Nilesh Rane | should vaibhav naik lay hands on god and say ranes big revelation about shivsena entry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | ‘तर मिशीच काय… भुवया पण काढून टाकेन आणि…’, उदयनराजेंचे चॅलेंज शिवेंद्रराजे स्वीकारणार का? (व्हिडिओ)

Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | पुण्याच्या विकासाचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले; मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे