…तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय ??, निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राणे कुटुंबीयांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. नीलेश आणि नितेश हे राणे बंधू विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर वारंवार टीका करत आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याच्यावरही ट्विटच्या टोला लगावला आहे. ‘दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली’, या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विधानाचा नीलेश राणे यांनी समाचार घेत ट्विट केलं.

भाजपा नेते नीलेश राणे यांचं ट्विट
शिवसेनेत सगळेच एकापेक्षा एक विद्वान भरले आहेत. सर्वात आधी दारूची दुकाने उघडली. दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले. त्याची यादी जाहीर करा.

अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधारणार नाही? प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?