Nilesh Rane | ‘… तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत’ – निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि त्यांच्या मुलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि ‘मातोश्री’ बद्दल बोलू नये असं मत व्यक्त केल्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कठोर शब्दात केसरकर यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काही ट्वीट करत केसरकर यांना लक्ष्य केलं आहे. केसरकरांविरोधात संताप व्यक्त करणारे काही ट्वीट बुधवारी रात्री निलेश राणे यांनी केली असून यामध्ये केसरकरांनी राणे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करत आम्ही गप्प बसणार नाही असं सांगण्यात आलंय.

 

उद्धव ठाकरे यांचा पुळका असेल तर दीपक केसरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत, असं ट्विट निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात राणे कुटंबीय आणि दीपक केसरकर यांच्यातील मतभेद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

काल दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी उद्धव ठाकरेंवर टीका करु नये, असा इशारा दिला होता. त्यानंतर राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. दीपक केसरकर कुठेतरी म्हणालेत की, राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण आघाडीमध्ये आहोत. हे विसरु नका. ही आघाडी टीकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावर आहे. तुम्हाला राजकीय जीवनदान मिळालंय हे विसरु नका. मान मिळतोय तो घ्यायला शिका, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही नव्यानेच मीडियासमोर बोलायला लागला आहात. कोणाला काय बोलायचं हे विचारुन घ्या असा इशारा निलेश राणे यांनी दिला होता.

 

त्यानंतर दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिले होते.
निलेश राणेंची काय लायकी आहे, हे आठ वर्षापूर्वी कोकणातील जनतेने दाखवून दिले आहे.
ते विसरले असतील तर जनता पुन्हा एकदा त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल, असा टोला केसरकर यांनी लगावला होता.

 

Web Title :- Nilesh Rane | then kesarkar should go to matoshree and wash uddhav thackerays utensils criticizes nilesh rane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा