पातळी घसरली ! निलेश राणेंनी शिवसेना खासदाराचा फोटो शेअर करत लिहिलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी खासदार व नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने टीका करत असतात. यावेळी शिवसेनेवर टीका करताना निलेश राणेंकडून टीकेची पातळी घसरली असून त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा फोटो शेअर करत त्यावर ‘डुक्कर’ असा उल्लेख केला आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला होता.

निलेश राणे यांनी ट्विटरवर विनायक राऊत यांचा फोटो शेअर करताना म्हंटले आहे की, ‘आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला.’ राणे यांच्या या ट्विटवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना ट्रोलही केले जाऊ लागले आहे.

राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वाद –

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवीन नाही. नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद सुरु आहेत. शिवसेना सोडल्यापासून राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र नेहमीच शिवसेनेवर टीका करताना दिसतात. राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेपासून तो वाद आणखी वाढला आहे. शिवसेना सोडल्यापासून राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करताना दिसतात तर लोकसभा 2014ची निवडणूक असो, विधानसभा असो, वांद्रे पोटनिवडणूक असो की, 2019ची लोकसभा निवडणूक, शिवसेनेने नारायण राणे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

Visit : Policenama.com

You might also like