4 हाडांचा ‘बीएमसी’ चोर कोकणात आला आणि ‘निघून’ गेला, राणेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर ‘घणाघात’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ कणकवलीमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. याला प्रत्युत्तर देताना माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि भाजपवर टीका केल्यानंतर भाजपकडून अद्याप प्रतिक्रीय दिलेली नाही. तर नारायण राणे यांनी वेळ आल्यानंतर उत्तर देऊ असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचे पडसाद कोकणात निश्चित उमटणार आहेत. भाजपच्या विरोधात सेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे सद्या कोकणात राणे विरुद्ध ठाकरे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करू नका असा सल्ला नारायण राणे यांना दिला होता. तो पाळत राणेंनी अद्याप तरी संयम पाळला आहे.

रत्नागिरीत शिवसेना सर्वच्या सर्व पाच जागा लढवत आहे तर सिंधुदुर्गात तीन जागा लढवत आहे. ठाकरे यांच्या टीकेमुळे रत्नागिरीमध्ये शिवसेने सोबत असणाऱ्या भाजपमध्ये आता फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि भाजवर टीका केल्यामुळे शिवसेना-भाजप आणि ठाकरे-राणे यांच्यातील वाद उफाळून आला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी