Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यामध्ये ड्रग्स (Drugs) आणि अंडरवर्ल्ड (underworld) संबंधावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा केला होता. यानंतर आता मलिक यांच्या कन्या नलोफर मलिक (Nilofar Malik) यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस (Legal notice) पाठवली आहे. तसेच लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा (defamation) खटला दाखल करण्याचा इशारा निलोफर मलिक (Nilofar Malik) यांनी दिला आहे.

 

यासंदर्भात निलोफर मलिक (Nilofar Malik) यांनी ट्विट करुन माहीती दिली. त्यांनी म्हटले की, खोटे आरोप एखाद्याचे जीवन उध्वस्त करु शकतात.
त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहोत, हे जाणून घेतले पाहिजेत.
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबत खोटे दावे (claims) आणि विधानं (statement) केली होती.
त्याबाबत ही मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. आता या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही, असेही निलोफर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे.
असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM उद्धव ठाकरे) यांनी भाजपच्या (BJP) नेत्यांचे नाव न घेता लगावला.
‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची माहिती आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मलिक यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली.
थोडक्यात मलिक यांच्या महिमेला महाविकास आघाडी सरकारने पाठिंबाच दिला आहे.

 

Web Title : Nilofar Malik | bjp leader devendra fadnaviss problems will increase nawab maliks daughter nilofar malik khan sent legal notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय रद्द

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Ileana Dcruz | पहिल्यांदाच झळकणार विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझची जोडी! अभिनेत्रीनं वेगळ्याच अंदाजात व्यक्त केला आनंद