Nimrit Kaur Ahluwalia | बिग बॉस स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया डिप्रेशनमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण…

पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस (Bigg Boss 16) हिंदी हा एक सगळ्यांच्याच आवडीचा रिअ‍ॅलिटी शो. खरतर या शोमध्ये अनेक विचारसरणीचे लोक एकत्र म्हणजेच एकाच छताखाली बरेच दिवस राहतात. नुसत राहतच नाहीत तर, मोठ्या प्रमाणात गदारोळही या शोमध्ये पाहायला मिळतो. दरम्यान सध्या बिग बॉसचा 16 सीजन सुरु आहे. या सीजनमध्ये निमृत अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) ही देखील एक स्पर्धक म्हणुन आली आहे. परंतु नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये ती नाराज असुन रडताना दिसली आहे. पाहिल गेलं तर निमृत (Nimrit Kaur Ahluwalia Breakdown) नेहमी तिच्या दृष्टिकोनावर ठाम राहताना दिसते. परंतु या भागात अभिनेत्रीचे ब्रेकडाउन झाले.

छोटी सरदारनी टीव्ही मालिकेतील अभिनेत्री (Actress of Chhoti Sardarani TV Serial) म्हणजेच निमृत अहलुवालिया (Nimrit Ahluwalia) यावेळी तिच्या चिंता आणि नैराश्याबद्दल बोलत आहे. दरम्यान बिग बॉसने निमृतला आपल्या भावनांबद्दल सविस्तर बोलण्यास सांगितले. यावेळी निमृत कौर अहलुवालिया म्हणाली की, “हो बिग बॉस 3-4 दिवस मला बरे वाटत नाही. मी थोडी क्लॉस्ट्रोफोबिक (Claustrophobic) आहे अशा प्रकारे तुम्हाला माहित आहे की मला माहित नाही की तुम्हाला माझ्या स्वभावाबद्दल समजले आहे की नाही. पण माझ्या मनातल्या गोष्टी घेणारी व्यक्ती मी नाही.

पुढे बोलताना ती म्हणाली की, “मला असे म्हणायचे आहे की, मला रात्री झोप येत नाही कारण माझे मन खूप अव्यवस्थित आहे. मला असे वाटते की माझा मेंदू थोडा थकल्यासारखे आहे. आणि असे नाही की मी बलवान नाही. बिग बॉस मला आशा आहे की हे संभाषण आपल्यात कायम राहील?’ यानंतर ती ढसाढसा रडायला लागते.

दरम्यान त्यानंतर, बिग बॉस तीला घरातील कोणत्याही सदस्या जवळ आपले मन मोकळ करण्यास सांगतात
ज्यांच्यासोबत ती सर्वात जास्त कम्फर्टेबल आहे. यावेळी बिग बॉसने निमृतला विचारले की घरात कोणी आहे
का जिच्यासोबत ती तिचे मन शेअर करू शकते. यावर निमृतने ती अब्दू आणि साजिदशी बोलू शकते असं सांगितल.
तथापि, ती अब्दूसोबत सर्वात सोयीस्कर आहे. कारण बहुतेक अब्दू यांनी मला कधीच न्याय दिला नाही.
‘ नंतर बिग बॉस तिला परिस्थितीसोबत राहण्याऐवजी त्याबद्दल बोलण्यास सांगतात.

Web Title :- Nimrit Kaur Ahluwalia | bigg boss 16 contestant nimrit kaur ahluwalia reveals she had depression and anxiety issue last 1 year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा, आम्ही ती जागा जिंकू’ – भाजप

Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे

Neha Malik | “हाय गर्मी…” नेहा मलिकच्या सिझलिंग स्टाइलने चाहते घायाळ, फोटो व्हायरल