नीना गुप्ताचे इंस्टाग्रामवर झाले 5 लाख फॉलोवर्स, आनंदाच्या भरात करू लागली ‘डान्स’ ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार नीना गुप्ता सध्या उत्तराखंडमधील मुक्तेश्वर हिल स्टेशनमधील आपल्या घरी पती विवेक मेहरा सोबत टाईम स्पेंड करत आहे. नीनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती आनंदानं नाचताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Thank you thank you

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं सांगितलं आहे की, तिचे इंस्टावर 5 लाख फॉलोवर्स झाले आहेत. यावेळी तिला झालेला आनंद तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नीना चाहत्यांना म्हणत आहे, तुमच्यामुळं झाले 5 लाख, तुम्या आशीर्वादानं झाले 5 लाख, तुमच्या प्रेमानं झाले 5 लाख, तुमच्या कमेंटनं झाले 5 लाख. इंस्टावर माझे 5 लाख फॉलोवर्स झाले. सर्वांचे खूप खूप आभार.” असं म्हणत नीना आनंदानं डान्स करत आहे.

View this post on Instagram

Ab kahan jaogi fashion ker ke madam

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीनाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं चार्डर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा याच्यासोबत 2008 साली लग्न केलं आहे. सध्या नीना आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसत आहे. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आणि नीनाचं अफेअर खूप चर्चेत राहिलं आहे. विवियन आणि नीना यांची एक मुलगी आहे. तिचं नाव आहे मसाबा गुप्ता मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिजायनर आहे.

नीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अॅमेझॉन प्राईमची सीरिज पंचायतमध्ये दिसली होती. याशिवाय काही दिवसांपर्वीच तिनं शुभमंगल ज्यादा सावधान आणि पंगा सिनेमात काम केलं आहे.