कोरोना काळात Apple चे 9 युनिट चीनमधून भारतात शिफ्ट : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माहिती प्रसारण आणि दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅप्पल मोठ्या प्रमाणात भारतात आपला उद्योग आणत आहे. गुरुवारी आयोजित ’बंगळुरू टेक समिट-2020’ च्या 23व्या उद्घाटन सत्रात रविशंकर प्रसाद यांनी दावा केला की, कोरोना काळात अ‍ॅप्पलचे 9 ऑपरेटिंग युनिट चीनमधून भारतात शिफ्ट झाले आहेत.

केंद्रीय मंत्री म्हणाले, मोबाइल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तेजी पाहता आम्ही प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या विचारासह आलो. यापूर्वी प्रसाद यांनी म्हटले होते की, सॅमसंग, फॉक्सकॉन, रायजिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉने पीएलआय स्कीमअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत.

बंगळुरू टेक समिटचे पीएम मोदींनी केले उद्घाटन
तीनदिवसीय बंगळुरू टेक समिट-2020 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उद्घाटन केले. यानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मोदी यांनी म्हटले की, त्यांच्या सरकारचे मॉडेल ’टेक्निकल फर्स्ट’ आहे, ज्याचा वापर लोकांच्या जीवनात मोठे बदल घेऊन आला आहे आणि याद्वारे लोकांच्या प्रतिष्ठेत वाढ झाली आहे. या कार्यक्रमात जगभरातील टेक्निकल एक्सपर्ट, संशोधकांसह अनेक लोक सहभागी होत आहेत.

पीएम मोदी यांनी म्हटले की, केंद्र सरकारचा ’डिजिटल इंडिया’ कार्यक्रम आज लोकांची जीवनशैली बनला आहे. विशेषता त्या लोकांचा जे गरीब आहेत. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आम्ही डिजिटल इंडियाची सुरुवात केली होती. मला हे सांगताना आनंद होत आहे की, याकडे सरकारच्या एखाद्या सामान्य उपक्रमाप्रमाणे पाहू नये.