‘त्या’ तहसीलदाराने चक्‍क पाकिस्तानच्या नावावर केली ९०० कोटींची जमिन ; तपासादरम्यान उघडकीस आला ‘धक्‍कादायक’ प्रकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वतंत्र्यावेळी जे लोक भारत सोडून लाहौरला गेले होते त्यांच्या नावावर अजून देखील तहसीलदारांनी जमिनी ठेवल्या. हे सर्व प्रकरण महित असताना देखील त्या व्यक्तींच्या नावे संपत्ती केली जे भारत सोडून पाकिस्तानला गेले आहेत.

प्रकरणाच्या तपासातून समोर आले की, मोदीनगरच्या सिकरीमध्ये जवळपास ९०० कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी तहसीलदारामुळे आतापर्यंत सरकारच्या ताब्यात आली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास ५०० एकरची जमीन सरकारला देण्यासाठी मुंबई स्थित कस्टडियनला पत्र लिहिले आहे. तर तहसीलदाराच्या विरोधात विभागीय कारवाईची मागणी केली आहे.

मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार मिळाली होती की, सिकरीमध्ये रस्त्याच्या किनाऱ्याला कितीतरी कोटींच्या जमिनी स्थानिक लोकांच्या ताब्यात आहे. जमीन स्वातंत्र्यकाळात पाकिस्तानात गेलेल्या एक व्यक्तीच्या नावावर आहे. नियमानुसार ती सरकारला मिळायला पाहिजे होती.

तक्रारीवर ऑगस्ट २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्या वेळेच्या एसडीएमकडे या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा माहिती मिळाली की स्वातंत्र्याआधी ही संपत्ती एका मुसलमान व्यक्तीच्या नावावर होती. तपासात समोर आले की, तहसीलदारने जुलै २०१८ मध्ये जमीनीच्या रेकॉर्डमध्ये त्याच व्यक्तीच्या नावावर संपत्ती दाखल केली जो पाकिस्तानात गेला आहे.

प्रशासनात घोटाळा असल्याचे समोर आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन एडीएमची नवी कमिटी गठित केली, ज्यात प्रकरणाची पुर्ण तपासणी केली जाईल. सर्व रेकॉर्ड पाहण्यात आले, स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली, तेव्हा समोर आले की ज्या व्यक्तीच्या नावावर ही संपत्ती आहे तो व्यक्ती भारत सोडून गेलेला आहे. अशा परिस्थितीत सर्व संपत्ती ही शत्रू संपत्ती असते, आणि त्यावर सरकारचा आधिकार असतो.

तपासणी आहवालात समोर आले की, तहसीलदाराच्या भूमिकेत शंका आहे. आहवालात सांगण्यात आले की, तहसीलदाराला माहित होते की ही जमीन शत्रू संपत्ती आहे. सर्व माहित असताना देखील देश सोडून जाणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ही संपत्ती करण्यात आली.

प्रकरणावर स्टे आणून हटवली संपत्ती –

विशेष म्हणजे जुलै महिन्यात २०१८ मध्ये तहसीलदाराने पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीच्या नावे संपत्ती रेकॉर्डमध्ये दाखल केली आणि तपासणी सुरु झाल्यावर एका महिन्यानंतर प्रकरणात स्टे देखील आणला आणि जानेवारी २०१९ मध्ये त्या व्यक्तीच्या नावावरुन संपत्ती देखील हटवली.

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट