महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘त्या’ नऊ जणांची निर्दोष मुक्तता

भोकर : पाेलीसनामा ऑनालाईन

माधव मेकेवाड

धावरीगावाजवळ बस जाळुन नुकसान केल्याप्रकरणातुन पुराव्याअभावी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ जणांची बुधवारी निर्दोष मुक्तता केली आहे. भोकर बस जळीत प्रकरणाचे या ९ जणांवर आराेप हाेते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1d666d9-cc9a-11e8-960e-69c92a4b5b13′]

राज ठाकरे यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या लोकांनी दगडफेक झाल्याने भोकर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी २७ फेब्रुवारी २०१३ रोजी भोकर-हदगाव रस्त्यावरील धावरी फाट्याजवळ महाराष्ट्र शासनाची एसटी बस क्रमांक .एम.एच २०डि ६६३० या गाडीवर दगडफेक करून, प्रवाशांना खाली उतरू न देता पेट्रोल टाकून बस जाळून टाकली हाेती.

यामध्ये १२ ते १३ लाख रुपयाचे नुकसान झाले अशी फिर्याद बसचालक अशोक उमाकांत वाघमारे रा. आष्टी ता.हदगाव यांनी दिल्यावरुन आरोपी योगेश शंकरराव यशवंतकर,परमेश्वर गंगाधर राव, माधव पाटील वडगावकर, सचिन पाटील किन्हाळकर, शंकर पाटील हाडोळीकर, माधव पाटील बोरगावकर, सुनिल पवार, आदिनाथ लुंगारे, गजानन जाधव यांच्याविरोधात भोकर पोलीसात  ३५ /२०१३ कलम १४३, १४७, १४८ ,१४९, ४३५, ४३६, ४२७, ३५३, ३०७,३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa2fda84-cc9a-11e8-a0b0-61e2d73f5c34′]

या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक पी.जी.पोव्हणे यांनी तपास करून भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले ९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली मात्र सबळ पुरावा न आल्याने न्यायाधीश मुजीब शेख यांनी ९आरोपींची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात आरोपींची बाजू अॅड.अनिल पाटील , अॅड. शिवाजी कदम नागपूरकर यांनी मांडली.