आता मदरशांमध्ये सुद्धा शिकवली जाईल गीता, रामायण आणि योग, NIOS ने अभ्यासक्रमात केला समावेश – रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरांबाबत 100 मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम नवीन शिक्षण धोरण (New Education Policy) चा भाग आहे. एनआयओएस इयत्ता 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करणार आहे. एनआयओएसने प्राचीन भारताच्या ज्ञानासंबंधी सुमारे 15 कोर्स तयार केले आहेत. यामध्ये वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, रामायण, गीता सह अन्य गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व कोर्स इयत्ता 3 री, 5 वी आणि 8 वी च्या प्राथमिक शिक्षणाच्या समान आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यावर एनआयओएसचे चेयरमन सरोज शर्मा यांचे म्हणणे आहे की, आम्ही हा कार्यक्रम 100 मदरशांमध्ये सुरू करत आहोत. भविष्यात आम्ही तो 500 मदरशांपर्यंत पोहचवू. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी नोएडा येथील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्यालयात स्टडी मटेरियल जारी केले. त्यांनी यावेळी म्हटले, भारत प्राचीन भाषा, विज्ञान, कला, संस्कृती आणि परंपरेचा खजिना आहे. आता देश आपल्या प्राचीन परंपरेला पुनर्जीवित करून ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपॉवर बनवण्यासाठी तयार आहे. आम्ही या कोर्सचा लाभ मदरसे आणि जगातील भारतीय समाजापर्यंत पोहचवू.

एनआयओएस दोन राष्ट्रीय बोर्डांपैकी एक आहे, जे प्रायमरी, सेकंडरी आणि सीनियर सेकंडरी स्तरावरील कोर्स ओपन आणि डिस्टन्स एज्युकेशनद्वारे करतात. त्यांच्या योगच्या कोर्स मटेरियलमध्ये पतंजली कृतासूत्र, योगसूत्र व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन, प्राणायाम, तणाव दूर करणारे व्यायाम आणि स्मरणशक्ती वाढवणार्‍या व्यायामचा समावेश आहे.

या विज्ञान कोर्समध्ये जल, वायु, शेती अणि वेद, उत्पत्तीचे सूत्र, पृथ्वी आणि नैसर्गिक संसाधनासंबंधी विषय आहेत. एनआयओएसचे असिस्टंट डायरेक्टर (अकॅडमिक) शोएब रजा खान यांचे म्हणणे आहे की, हा अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध होईल. ओपन एज्युकेशन सिस्टम अंतर्गत विद्यार्थ्यांना याच्या निवडीचे स्वातंत्र्य असेल. हे अनिवार्य नाही.