‘निपाह’ विषाणूचा वाढतोय धोका ; ‘या’ राज्यातील जिल्ह्यांत अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये पसरत असलेल्या निपाह विषाणूमुळे लोक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपुर्वी केरळ मधील 23 वर्षाच्या काॅलेज मधील विद्यार्थ्याला निपाह विषाणूची बाधा झाली होती. याचीच खबरदारी म्हणून केरळच्या शेजारील कर्नाटक सरकारने केरळला लागून असलेल्या 8 जिल्हांमध्ये अलर्ट लागू केला आहे.

निपाह विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने कर्नाटकच्या आरोग्य विभागाने एक माहितीपत्रक जारी केले आहे. चामराजनगर, कोडागु, दक्षिण कन्नड, मैसूरु, उडपी, शिवमोगा, उत्तर कन्नड आणि चिकमंगलुरू या जिल्ह्यांतील प्रशासनाला तात्काळ अंतरविभागीय समन्वय समितीची बैठक बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात भारतीय बालचिकिस्ता अकादमी, भारतीय चिकिस्ता संघ आणि पशू चिकिस्ता विभाग देखील सहभागी करण्यात आले आहे.

या आठ ही जिल्हात प्रशासकीय आधिकाऱ्यांना निपाह विषाणू रोखण्यासाठी संपुर्ण प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक ते सर्व सामान उपल्बध करुन देण्यास देखील सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील परिस्थितीवर लक्ष देण्याचे आदेश कर्नाटक सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच निपाह विषाणू संबंधीचा अहवाल दररोज दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे की निपाहची लागण झालेला विद्यार्थ्याची परिस्थिती सध्या चांगली असून, संपर्कात आलेल्या 314 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.