Nipah virus in Satara : सातार्‍यात आढळला कोरोनापेक्षा जास्त भयंकर ’निपाह व्हायरस’, जाणून घ्या त्याची 8 लक्षणे अन् बचावाचे उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – महाराष्ट्रात (Maharashtra) निपाह व्हायरस (Nipah virus in Satara) सापडला आहे, जो कोरोना व्हायरसपेक्षा (Corona virus) भयंकर मानला जातो. कारण याच्यावर अजूनही कोणते औषध किंवा व्हॅक्सीन (Vaccine) नाही. यामुळे चिंता वाढली आहे. हा व्हायरस वटवाघुळात (Vatvaghul) मिळाला आहे. रिपोर्टनुसार महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील (Satara District) महाबळेश्वरच्या एका गुहेत निपाह व्हायरस आढळला आहे. महाबळेश्वरच्या जंगलातील एका गुहेत राहणार्‍या वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस असल्याचे समोर आले आहे. Nipah Virus in Satara | nipah virus researcher found nipah virus antibodies in bats from mahabaleshwarr know nipah virus

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शास्त्रज्ञांनी या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे. या वृत्ताला दुजोरा मिळताच स्थानिक लोक अस्वस्थ झाले असून त्यांना नवीन धोक्याची चिंता सतावत आहे.

मार्च 2020 मध्ये पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महाबळेश्वरच्या गुहेत वटवाघुळांच्या घशातून स्वॅबचे नमुने घेतले होते. या सॅम्पलच्या तपासणीत समजले की वटवाघुळांच्या स्वॅबमध्ये निपाह व्हायरस आढळला आहे. शास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व करणार्‍या डॉ. प्रज्ञा यादव (Dr. Pragya Yadav) यांच्यानुसार यापूर्वी निपाह व्हायरस महाराष्ट्राच्या कोणत्याही वटवाघुळात आढळला नव्हता.

निपाह व्हायरस काय आहे (What is Nipah Virus)
निपाह व्हायरसमुळे होणारे इन्फेक्शन (Infection) जनावरांमधून मनुष्यात पसरते. हा व्हायरस जनावरे आणि मनुष्यात गंभीर प्रकारचा आजार निर्माण करतो. या व्हायरसचा प्रारंभिक स्त्रोत फळे चुपणार्‍या वटवाघुळात आहे.

या जीवघेण्या व्हायरसवर कोणताही उपचार नाही.
हा मनुष्य आणि जनावरांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
डब्ल्यूएचओच्या (WHO) रिपोर्टनुसार निपाह व्हायरस टेरोपस जीनस नावाच्या एका खास वंशाच्या वटवाघुळातून मिळाला आहे.

कसा पसरतो निपाह
या जीवघेण्या व्हायरसमुळे मृत्यूची जोखीम 65 ते 100 टक्के आहे.
निपाह व्हायरस थेट संपर्काने पसरतो.
सोबतच संक्रमित व्यक्तीसोबत जेवण शेयर करण्याने सुद्धा पसरतो.
यामुळे संक्रमित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, डोळे येतात, थकवा आणि वेदना जाणवतात.
मेंदूच्या तापासारखी लक्षणे दिसतात.
जास्त ताप आल्याने मेंदूला सूज येते आणि मनुष्याचा मृत्यू होतो.

निपाह व्हायरसची लक्षणे, कारणे आणि बचावाचे उपाय

1) निपाह व्हायरसच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास, मेंदूची सूज, निद्रानाश, मळमळ, कमजोरी, विचलित होणे, भ्रम स्थिती इत्यादीचा समावेश आहे. एखादा रूग्ण 48 तासांच्या आत कोमात जाऊ शकतो.

2) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननुसार, या भयंकर व्हायरससाठी अद्याप कोणतेही औषध किंवा व्हॅक्सीन नाही. याद्वारे संक्रमित व्यक्तीसाठी केवळ ’इन्सेंटिव्ह सपोर्टिव्ह केयर (आयएससी) उपचारच आहेत.

3) हा व्हायरस डुक्कर आणि इतर पाळीव प्राण्यांना सुद्धा संक्रमित करू शकतो.

4) डबल्यूएचओनुसार, एनआयव्ही पहिल्यांदा 1998 मध्ये मलेशियामध्ये ओळखण्यात आला होता. 2004 मध्ये खजूरचे सेवन केल्यानंतर अनेक लोक संक्रमित झाले होते. याचे कारण हे होते की, त्यांनी वटवाघुळाने चुपलेल्या खजूराचे सेवन केले होते.

5) हा व्हायरस संक्रमित वटवाघुळ, डुक्कर, किंवा या व्हायरसने पीडित व्यक्तीशी थेट संबंध आल्यास पसरतो. डॉक्टर सल्ला देतात की, जमीनीवर पडलेली फळे सेवन करू नयेत. हा हवेतून पसरणारा व्हायरस नाही.

6) यापासून वाचण्यासाठी डुक्कर, वटवाघुळ आणि याद्वारे पीडित व्यक्तीपासून दूर राहावे.

7) डॉक्टरांनी यापासून बचाव करण्यासाठी रुग्णांवर उपचार करताना मास्क आणि ग्ल्वोव्हज घालावेत.

8) डुक्कर पालन करणार्‍यांनी त्यांच्या जवळ जाऊ नये आणि इतर लोकांनाही रोखावे.

Web Title :- Nipah Virus in Satara | nipah virus researcher found nipah virus antibodies in bats from mahabaleshwarr know nipah virus

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’