निपाणी : महाराष्ट्रात खून करुन मृतदेह टाकला कर्नाटक हद्दीत

बोरगाव : पोलीसनामा ऑनलाईन

बोरगाव (ता:निपाणी)येथे एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना बोरगाव -आयको रस्त्यावर घडली आहे. ही घटना रविवारी (ता.१२) पहाटे उघडकीस आली आहे. या महिलेचा माहाराष्ट्रात खून करुन तिचा मृतदेह कर्नाटक राज्याच्या हद्दीत टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85447bc2-9e45-11e8-9a87-af7b2ea00982′]

दिशा दिनेश पाटील (वय३७,रा. इचलकरंजी) असे या महिलेचे नाव आहे. तिच्या अंगावर जीन्स पॅन्ट व भगव्या कलरचा टॉप आहे. तीच्या पर्समध्ये जन्मकुंडली सापडली असून त्यावरून तिचे नाव समजले आहे. प्राथमिक चौकशीनंतर तिचा गळा दाबून धारधार शास्र्तने खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात तिचा खून करून कर्नाटक हद्दीत आणून टाकल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रभू डी .टी. पोलीस निरीक्षक एम. एस. नायकर, फौजदार संगमेश दिडगीनहाळ व आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. सदलगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत.

मयत  दिशा व दिनेश यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघेही उच्च शिक्षित होते. मयत दिशा यांच्या पश्यात एकलुता एक मुलगा आहे. पण दिनेश हा काही दिवसांपासून मयत दिशावर चरित्राचा संशय घेत होता. काल रात्री नातेवाहिनाकांही  दिशाबद्दल संशीयीत आरोपी दिनेश याने या बाबत कल्पना दिली होती. घटनास्थळी उशिरा चिकोडी येथे शवविच्छदन करून मृत्यदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8e570611-9e45-11e8-b6b2-0d9850225463′]

इचलकरंजी येथील एक नामांकित दंत चिकिस्तक यांच्याबरोबर मयत दिशा यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दिनेश याला आल्यानेच खून झाल्याचे घटनास्थळी असलेल्या व्यक्तींकडून बोलले जात होते. पुढील तपास सदलगा पोलीस करीत आहेत.