निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांचा ‘निरोप’ समारंभ संपन्न

लासलगाव – निफाड तहसीलदार यांचा बदली निरोप समारंभ ,तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी सेन्द्रे ,बाळकृष्ण आहेर डॉक्टर, परिचारिका आणि लासलगाव परिसरातील सर्व पत्रकार यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वी एन नायक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप,भाजप कोषाध्यक्ष प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, बाजार समितीचे संचालक शिवनाथ जाधव, रमेश पालवे, अनिल सोनवणे,वनसगावचे सरपंच उन्मेष डुंबरे,पं.स. उपसभापती संजय शेवाळे, संपत नागरे, उद्योगपती संतोस पलोड,नीरज भट्टड,भरत कानडे, राजेंद्र चाफेकर,लासलगाव भाजप शहराध्यक्ष योगेश पाटील, रवि होळकर, समीर समाडिया,निलेश लचके, सचिव नरेंद्र वाढवणे,व्यापारी मनोज जैन,अमित भावसार मंडल महिला अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, रूपा केदारे, रंजना शिंदे, सिंधु पाल्हाळ,आदी उपस्थित होते.