नीरा व परिसरात परतीचा जोरदार पाऊस, वीर धरणातूून 23 हजार 185 क्यूसेक्सने विसर्ग

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –   पुरंदर तालुुुक्यातील नीरा व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असताना त्यातच बुधवारी (दि.१४) दिवसभर परतीच्या मुसळधार पावसाने कहरच केला. परतीच्या पावसाने कोथंबीर, सोयाबीन , कांदा ही पिके वाया गेली असून नविन ऊस लागणीत पाणी साचून राहिल्याने शेतकरी चिंतेेत आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत २३ हजार १८५ क्यूसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले. दरम्यान बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने नीरेतील आठवडे बाजारात शेतकरी, व्यापा-यांंची धांदल उडाली.

सुर्याच्या चित्रा नक्षत्रात गेल्या तीन – चार दिवसांपासून ढगाळ हवामानबरोबर उकाडाही जाणवत होता. त्यामुळे नीरा व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजांच्या गडगडाटासह कमी – अधिक प्रमाणात जोरदार मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नीरा – शिवतक्रार, गुळूंचे, कर्नलवाडी, पिंपरेखुर्द आदी भागात सर्वत्र पााणी- पााणी झाल्याने चार रूपये मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी ऊस पिकात लावलेला सोयाबीन, कोथंबीर , कांदा नासला.

त्यामुळे शेेतक-यांच्या आशेवर पाणी फिरले असल्याची भावना शेेतकरी व्यक्त करीत आहे. तर जुलै महिन्यांत लागणी केलेल्या ऊसात पाणी साचल्याने ऊसाचे बेणे कुजून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच ऊस क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुधवारी ( दि.१४) दिवसभर पावसाने

उघडीप न दिल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नसल्याने नीरा येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करता आला नाही. त्यामुळे शेतकरी व व्यापा-यांचे नुकसान झाले.त्यातच पावसामुळे शेतकरी, व्यापा-यांची भलतीच धांंदल उडाली .

दरम्यान, वीर धरणातून नीरा नदीत बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत १४ हजार ५११ क्युसेक्सने
व रात्री सात वाजता विसर्गात आणखी वाढ करून २३ हजार १८५ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आल्याने नीरा नदी दुधडी वाहू लागली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजलेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे जलसंपदा खात्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.