नीरेत पाळीव डुकराला हुसकावल्यावरून झालेल्या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी, 5 जणांना अटक

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा (ता.पुरंदर ) येथील वार्ड नं. सहा मधील एका बाहुबंदकीमध्ये पाळीव डुकरांना हुसकावल्यावरून झालेल्या वाद विकोपाला गेल्याने झालेल्या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद अनिल रतन माने यांनी जेजुरी पोलीसांत शनिवारी दिली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीरा वार्ड.नं.सहा मधील अनिल रतन माने यांच्या घरासमोर आंघोळीसाठी पाणी काढलेल्या बादलीत अविनाश वामन माने यांच्या मालकीच्या पाळीव डुकरांने तोंड घातले म्हणून त्याला फिर्यादी अनिल रतन माने यांनी हुसकावण्यासाठी दगड मारला या कारणावरुन त्यांच्याच बाहुबंदकीतील अविनाश वामन माने, गणेश यशवंत माने, अजय वामन माने, संतोष जाधव ( पुर्ण नांव माहित नाही ) , अश्विनी संतोष माने सर्व रा.नीरा वार्ड नं.सहा यांनी संगणमत करून शाम रतन माने , दिनेश अनिल माने,

शालन रतन माने, मीना शाम माने व बापू ज्ञानोबा माने यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने सळईने, काठीने व लथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली त्या नंतर भीती पोटी घरात गेलेल्या शाम रतन माने, बापू ज्ञानोबा माने यांना घरात घुसूनही जबर मारहाण करून जीवे ठार माारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद अनिल रतन माने यांनी जेजुरी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

या घटनेचा तपास जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा पोलिस दुरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे करीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like