बारामतीच्या पाण्यावरून राष्ट्रवादीला खा. उदयनराजेंकडून ‘आहेर’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा देवधर धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता टीका केली. स्वयंघोषित भगिरथाने जाणीपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने काही तालुके पाण्यापासून वंचित राहिले. त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी १४ वर्षे पाणी बारामतीला पळवले. तसेच जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

नीरा देवधर धरण २००४ मध्ये बांधून तयार झाले. या धरणाचे पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांतील लाभक्षेत्र संचिनाखाली येणे अपेक्षीत होते. मात्र, स्वयंघोषीत भगिरथामुळे हे तालुके पाण्यापासून वंचित राहिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कारवाई झाली पाहिजे असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

१९५४ च्या पाणी वाटपानुसार निरेच्या उजव्या कालव्यातून ५७ टक्के तर डाव्या कालव्यातून ५३ टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. उजव्या कालव्यातून सोलडलेल्या पाण्यामुळे सांगला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांना फायदा झाला असता मात्र तसे झाले नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत आल्यावर यामध्ये बदल करून मोठा वाटा बारामतीला दिला असल्याचा आरोप उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करणा-या काही दलालांनी अधिका-यांना हताशी धरून शिरवळ आणि खंडाळा येथील जमिनी कोट्यावधी रुपयांना विकल्या. विकलेल्या जमिनींचे पुरावे माझ्याकडे आहेत. शासनाने या दलालांवर कारवाई करावी तसेच त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आता पुन्हा एकदा १९५४ च्या कायद्यानुसार पाणीवाटपाचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांची तहान भागणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन११ राज्यात लवकरच नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, भाजपच्या ‘या’ ९ बडया नेत्यांची नावे चर्चेत

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात