नीरा ग्रामपंचायत निवडणूक : सोशल मिडियावर चुकीचा मेसेज फॉरवर्ड करणार्‍यांवर गुन्हा दाखल करणार – जेेजुरीचे PI सुनिल महाडिक

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –   पुरंदर तालुक्यातील नीरा- शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच सोशल मिडियावर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून निवडणुकीत सोशल मिडिया व व्हाट्स अप ग्रुपवर चुकीचा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले.

नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नीरा पोलिस दुरक्षेत्रात
बुधवारी (दि.६) सायंकाळी सात वाजता उमेदवारांची, पँनेल प्रमुखांची बैठक जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी आयोजित केेली होती. त्यावेळी पि.आय.सुनिल महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नीरा पोलिस दुरक्षेत्राचे फौजदार कैलास गोतपागर ,पोलिस पाटील राजेेंंद्र भास्कर, पँनेल प्रमुख, उमेदवार ,पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.

सुनिल महाडिक पुढे म्हणाले कि, नीरा -शिवतक्रार ग्रामपंंचायतीची निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावी. सोशल मिडिया व व्हाट्स अप ग्रुपवर जो चुकीचा मेसेज फॉरवर्ड करेल त्यावर पोलिस यंत्रणेचे बारकाईने लक्ष आहे. चुकीचा मेसेज तयार करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच मेसेज फॉरवर्ड करणारा सुद्धा दोषी आहे. अशा व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तरी जनतेने याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Advt.

पोष्टर , बँनर यावर प्रकाशकांचे नांव व मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत निवडणूका असलेल्या गावातील लोकांवर गुन्हे नोंद असलेल्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे

पोलिस निरीक्षक महाडिक यांनी सांगितले.

दरमान, निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांनी डी.जे.चा वापर करून मिरवणुक काढण्यास बंदी आहे. जर मिरवणूक काढली तर अशांवर आचारसंहितेचा भंग व कोव्हिड कायद्यांंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिला आहे.