नीरेत 9 हजाराची देशी विदेशी दारू जप्त ; दोघांना अटक

नीरा  : पोलीसनामा –   ऑनलाइन येथील पालखीतळा जवळ ९ हजार ३९६ रूपये किंमतीचे
देशी विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन जाणा-या दोन इसमास नीरा पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबत नीरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, नीरा गावातील पालखीतळा जवळ पांढऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात काहीतरी घेऊन जात असल्याची माहिती खब-यांमार्फत मिळाल्यावरून सदर इसमांना पकडले असता त्यांनीउमेश संजय खोमणे (रा.खराडेवाडी ता.फलटण ) व करण विठ्ठल बोडरे (रा. पिंपळवाडी ता.फलटण) असे नाव सांगितले व त्यांच्या जवळील प्लॅस्टिकचे पोत्यामध्ये पाहिले असता त्यामध्ये ७ हजार ९५६ रूपये किंमतीची टँगो १८० मिलीच्या १५३ बाँटल, तसेच १ हजार ४४० किंमतीची १८० मिलीच्या आँफिसर चाँईस कंपनीच्या १२ बाँटल्स असे ९ हजार ३९६ रूपये किंमतीचे देशी विदेशी दारू आढळून आली. यावरून उमेश संजय खोमणे (रा.खराडेवाडी ता.फलटण ) व करण विठ्ठल बोडरे (रा. पिंपळवाडी ता.फलटण) यांनी बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी विदेशी दारू बाळगल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा पोलीस दुरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे, पोलिस हवालदार सुदर्शन होळकर, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव हे यांनी ही कारवाई केली. सदर घटनेचा तपास पोलिस नाईक राजेंद्र भापकर करीत आहेत.