कोरोनामुळे निरंजनी आणि आनंद अखाड्याचा मोठा निर्णय, 17 एप्रिलला कुंभ समाप्तीची केली घोषणा

हरिद्वार : वृत्त संस्था – हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे अचानक वाढल्यानंतर निरंजनी आखाडा आणि आनंद अखाड्यांनी 17 एप्रिलला कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा केली आहे. अखाड्याचे सचिव महंत रविंद्र पुरी यांनी कुंभमेळ्याच्या समारोपाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, मुख्य शाही स्नान संपन्न झाले आहे, त्यानंतर अखाड्यांमध्ये मोठ्या संख्येने संत आणि भक्तांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पहाता आमच्या अखाड्याने 17 एप्रिलला कुंभ समाप्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी म्हटले की, हा अखाडा परिषदेचा निर्णय नाही, हा आमच्या अखाड्याचा वैयक्तिक निर्णय आहे. बहुतांश अखाड्यांचे हेच मत आहे, आम्ही आमच्या अखाड्यात कुंभ समारोपाची घोषणा केली आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रविंद्र पुरी महाराजांनी अखाड्याकडून कुंभ समाप्तीची घोषणा केली. तर कैलाश नंदगिरी यांच्या निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा दोघांनी अखाड्याबाबत म्हटले की, कोरोनामुळे अखाडा 17 तारखेला कुंभ समाप्तीची घोषणा करेल.

रविंद्र पुरी यांनी म्हटले की, 27 एप्रिलच्या शाही स्नानाला 40 ते 50 पंथी स्नान करतील आणि स्नान करून परत जातील, ही घोषणा केवळ पंचायती अखाड्याकडून आहे. निरंजनी अखाड्यानंतर अन्य 5 सन्यासी अखाडे सुद्धा आपल्या येथे कुंभ समाप्तीची घोषणा करू शकतात. तर अजून 27 एप्रिलचे शाही स्नान होणे बाकी आहे. या शाही स्नानात आता केवळ 3 वैरागी, दोन उदासीन आणि एक निर्मल अखाडाच राहतील.

उत्तराखंडमध्ये गुरूवारी आतापर्यंत कोरोना व्हायरस संसर्गाची एका दिवसात सर्वाधिक 2220 नवी प्रकरणे समोर आली आहेत. नवी प्रकरणे आल्याने एकुण रूग्णांची संख्या वाढून 116244 झाली आहे. गुरूवारी 9 रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.