निरव मोदी नंतर आता पीएनबी बँकेला पुन्हा  ५३९ कोटींचा गंडा …! 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघे  नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून परदेशात पसार  असताना आता याच बँकेला व्हीएमसी सिस्टीम्स या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीने ५३९ कोटींचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. व्हीएमसी सिस्टीम्सच्या संचालकांनी पीएनबीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा केला असून पीएनबी बँकेनेच याबाबत तक्रार केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5fc3463-c2dc-11e8-9483-c5c5bfbbef7a’]

बँकेच्या तक्रारीनुसार हा १७०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असून त्यात पीएनबीसह स्टेट बँक, कार्पोरेशन बँक, आंध्र बँक, जेएम फायनान्स अॅसेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी यांनाही गंडा घालण्यात आला आहे. १७०० कोटींमध्ये पीएनबी बँकेची व्हीएमसीकडे ५३९ कोटी इतकी थकबाकी असून अन्य बँकांचे १२०७ कोटी रुपये थकवण्यात आले आहेत.
पीएनबीच्या तक्रारीवरून व्हीएमसी कंपनीचे संचालक व प्रवर्तक वुप्पलटई हिमा बिंदू, वुप्पलटई व्यंकट रामाराव, भाग वटुला व्यंकटरमण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआय तपास करत असून कंपनीच्या हैदराबादमधील तीन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

सहावीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पीएनबीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जसा घोटाळा केला तशाच प्रकारे व्हीएमसीनेही अधिकाऱ्यांशी संगनमत करून पीएनबी व अन्य बँकांना गंडा घातल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3aa186fd-c2df-11e8-9e14-9f9957870213′]