PNB बँक घोटाळा : PMLA कोर्टाकडून आरोपी नीरव मोदी ‘फरार’ घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याला आज फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार पीएमएलए न्यायलयाने हा निर्णय दिला. तसेच फरार आरोपी गुन्हेगार नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटींचा चूना लावून नीरव मोदी फरार झाला होता. बँकेकडून त्याला बेकायदा कर्ज देण्यात आले होते असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले.

फॉरेन्सिक ऑडिटचे काम बेल्डियमच्या प्रख्यात बीडीओ या ऑडित कंपनीकडे सोपवण्यात आले होते. त्यानी आतापर्यंत 5 अंतरिम आणि एक अंतिम अहवाल पीएनबीला सोपावला.यातच या बेकायदा हमीपत्रांचा उल्लेख आहे.घोटाळ्याचा तपास सीबीआय कडून करण्यात येत आहे तर आर्थिक व्यवहारांच्या तपासणीचे काम बँकेने बीडीओ या ऑडिट कंपनीकडे देण्यात आले होते. यात दिसून आले की पीएनबीने 28 हजार कोटी मूल्यांची 1561 हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) नीरव मोदीला दिली होती. त्यातील 25 हजार कोटी रुपयांची 1,381 हमीपत्रे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.

23 जणांच्या या हमीपत्रातील 21 जण नीरव मोदीच्या थेट संबंधित होते. त्यापैकी 193 हमीपत्रांचा गैरवापर केल्याचे या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले. अमेरिकेतील इंटरनॅशनल ऑफ कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट या संस्थेला हा अहवाल मिळाला. यात नीरव मोदीच्या भारतातील 20 मालमत्यांचा उल्लेख आहे. परंतू या मालमत्तेतील कोणतीही मालमत्ता कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आली नव्हती.

बीडीओ कंपनीने आपल्या अहवालात नीरव मोदीकडील 15 महागड्या कार्स, एक बोट, 106 महागड्या पेंटिग्स याचा उल्लेख आहे. जामिनी रॉय, राजा रवी वर्मा, एम. एफ. हुसैन यांच्या या कलाकृती आहेत.याची सर्वांची किंमत 20 कोटी रुपयांच्या घरात आहे.