ब्रिटनमध्ये 7 सप्टेंबरपासून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर सुनावणी

पोलीसनामा ऑनलाइन: काही दिवसांपूर्वीच झालेला पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा ताजाच आहे. आता त्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाच्या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुनावणी सोमवारी ब्रिटनच्या कोर्टामध्ये सुरुवात होणार आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे असणार आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कडून सुमारे 14,000 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक (पीएनबी स्कॅम) केल्याचा आरोप आहे.

मार्चमध्ये निरव मोदीला अटक केल्यापासून तो लंडनच्या तुरूंगात आहे. भारत सरकारने ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या (सीपीएस) माध्यमातून नीरवच्या प्रत्यार्पणाबद्दल लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात खटला दाखल केला आहे.

कोरोना विषाणूवरील वाढता प्रभाव पाहता जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूजी यांनी वेडसवार्थच्या कारागृहातील एका खोलीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश मोदींना दिले आहेत. ही सुनावणी पाच दिवसांची असणार आहे, आणि ती शुक्रवारी संपणार आहे.