भारतात आल्यानंतर नीरव मोदीचा मुक्‍काम ‘या’ कारागृहात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृहा ठेवता येऊ शकते का याची चाचपणी सुरु असून यासंदर्भातील अहवाल राज्याच्या कारागृह विभागाने केंद्राला पाठविला आहे.

कारागृहातील या बराकीत करणार व्यवस्था

नीरव मोदीला अटक कऱण्यात आली. त्यानंतर त्याला आता भारतात आणण्याची तजवीज सुरु आहे. परंतु त्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड कारागृहात ठेवण्याचा विचार सरकार करत आहे. त्यासाठी राज्याच्या कारागृह विभागाने अहवाल केंद्राला पाठविला आहे. त्यानुसार त्याला आर्थर रोड कारागृहातील बराक नं १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. तर त्या बराकीत त्याला वेगवेगळ्या सुविधाही पुरविण्यात येणार आहेत.

या सुविधा मिळणार

नीरव मोदीला आर्थर रोड कारागृहातील बराक नं १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. ही बराक सर्वाधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे पुरेशा सुर्यप्रकाश, हवा आणि शुध्द पाण्याची सोय करण्यात आली आहे. तर त्याच्या मागणीनुसार त्याला लाकडी पलंग देण्यात येणार आहे. तसेच त्याला दिवसभरातून १ तासापेक्षा अधिक वेळेसाठी कोठडीबाहेर येऊन व्यायाम करण्याची परवानगीसुध्दा देण्यात येणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात