‘कयामत की रात’ मधील तांत्रिक कालासुर फेम निर्भय करतो स्वतः स्टंट

मुंबई : वृत्तसंस्था

स्टार प्लस वरील प्रसिद्ध मालिका ‘कयामत की रात’  प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे या मालिकेत वेगवेगळे ऍक्शन सिक्वेन्स केले जातात जे दर्शकांकडून पसंत केले जात आहेत.

खरेतर ऍक्शन सिक्वेन्स करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम आहे. याकरिता स्टंट मन नियुक्त केले जातात मात्र ‘कयामत की रात ‘ या मालिकेत तांत्रिक कालासुर नावाच्या खलनायकाचे  पात्र निर्भय वाधवा साकारत आहे . खलनायचे हे पात्र त्याने मालिकेत उत्तम रंगवले आहे. त्याची शरीरयष्टी अतिशय शक्तिशाली दाखवण्यात आली आहे. त्याचे मालिकेतील रूप पाहून कोणाला ही भिते वाटणार यात शंका नाही . हे पात्र रंगवणारा अभिनेता निर्भया वाधवा आपले स्टंट स्वतः करतो. या मालिकेचा तो प्रमुख खलनायक आहे.  या खलनायकाच्या पात्राकरिता निर्भय खूप जास्त मेहनत घेतो आहे. या मालिकेत त्याची तांत्रिकाची भूमिका आहे. यात या पात्राकडे अशा काही शक्ती आहेत ज्या सर्वसामान्य माणसाकडे नाहीत. या पात्राकरिता तो  कठीण वर्कआउट आणि आपलया डाएट कडे खूप लक्ष देतो.

 या भूमिकेबद्दल निर्भय ला विचारले असता , ” मी स्वतः:चे स्टंट स्वतः करतो. केवळ बॉडी बिल्डिंग वर माझा भरवसा नाही पण ताकद कमावण्यात माझा भरवसा आहे. तसे पाहिले तर स्टंट मन खूप चांगले काम करतात. पण मला स्वतः ला माझे स्टंट मालाचा करायला आवडतात “. अशी प्रतिक्रिया निर्भय ने दिली आहे.
[amazon_link asins=’B07C4YKR3J,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb642e36-a5f7-11e8-bdf8-19a1bba17203′]