निर्भया केस : दोषी अक्षयची नवी ‘युक्ती’, राष्ट्रपतींना पुन्हा लिहीलं ‘पत्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी एक असणाऱ्या अक्षयने फासावर लटकू नये म्हणून एक नवीन युक्ती केली आहे. अक्षयचे वकील एपी सिंह यांच्यानुसार अक्षयने 1 फेब्रुवारीला राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते, ज्यात अक्षय याची स्वाक्षरी न करता राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आली होती. म्हणून, दया याचिकेची दखल घेतली जाऊ नये.

अक्षयचे वकील ए.पी. सिंह यांच्या मते राष्ट्रपती भवनात मान्यतेच्या शिक्क्यांशी संलग्न पत्रात म्हटले की, 31 जानेवारी रोजी दाखल केलेल्या दया याचिकेवर अक्षयच्या सही किंवा अंगठ्याचे प्रिंट नाही. तसेच तिहार जेल प्रशासनाने याचिका प्रमाणित केलेली नाही. त्याबरोबरच, आरोपीची आर्थिक परिस्थिती आणि त्या प्रकरणाची पूर्ण माहिती न घेता घाईत याचिका दाखल केली गेली.

दरम्यान, या प्रकरणी दिल्ली सरकारने पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करत मृत्यूचे वॉरंट जारी करण्याची मागणी केली. तिहार जेल प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला असून चार दोषींवर नव्याने मृत्यूदंडाची मागणी केली आहे. तिहार जेल प्रशासनाने आपल्या अर्जात म्हटले आहे की अक्षय, मुकेश आणि विनय यांची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे.

तिहार जेल प्रशासनाने युक्तिवाद केला की कोणत्याही फोरममध्ये दोषीची कोणतीही याचिका प्रलंबित नाही, त्यामुळे नवीन मृत्यूदंड वॉरंट देण्यात यावे.