निर्भया केस : जेव्हा मुकेशनं स्वतः सांगितलं कशामुळं निर्भयावर झाली एवढी ‘जबरदस्ती’ अन् ‘क्रुरता’, खुपच ‘घाणेरडे’ विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. सध्या तिहारमध्ये फाशीची तयारी सुरू आहे. दरम्यान, आरोपी संतापल्याचेही समजते. त्याचवेळी त्यांचे वकील त्यांचे संरक्षण करण्यासाठी कसलीही कसर सोडत नाहीये. कोणी निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल करत आहे, तर दुसरा राष्ट्रपतींकडे नवीन दया याचिका पाठवित आहे. दरम्यान, अशी बातमी आली की दोषी मुकेशची आई आपल्या मुलाची फाशी थांबवण्यासाठी न्यायालयात रडली आहे. गुन्हेगार मुकेश तोच आहे जो २०१५ मध्ये एका माहितीपटातही दाखवला होता आणि त्याने आपले विचार जगासमोर ठेवले. मुकेशने त्या माहितीपटात ज्या गोष्टी बोलल्या त्यातून त्याचे घाणेरडे विचार बाहेर येते.

‘इंडियाज डॉटर’ अर्थात ‘भारताची मुलगी’ या माहितीपटात मुकेश सिंगने म्हटले होते की, पुरुषांपेक्षा जास्त महिलाच बलात्कारास जबाबदार असतात. डिसेंबर २०१२ च्या त्या रात्री ‘निर्भया’ एका पुरुष मित्रासह घरी परत जात असताना बसमध्ये चढली. बसमध्ये निर्भयाच्या विनयभंगाचा विरोध झाल्याने तिच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेवर मुकेश सिंह यांनी माहितीपटात म्हटले होते- ‘सभ्य स्त्रियांनी रात्री नऊनंतर घराबाहेर जाऊ नये. बलात्कारासाठी मुलगीच नेहमी मुलापेक्षा जास्त जबाबदार असते. मुलगा आणि मुलगी समान नाहीत. मुलीने घरकाम करावे, ना की रात्री डिस्को किंवा बारमध्ये जाऊन चुकीचे काम करावे किंवा वाईट कपडे घालावेत. ‘

‘निर्भया’वरील हिंसाचाराबद्दल मुकेश म्हणाला कि-‘ बलात्काराच्या वेळी तिने (निर्भया) विरोध करायला नको होता. तिने शांतपणे बलात्कार होऊ द्यायला पाहिजे होता. जर तसे झाले असते तर आम्ही तिला इजा न करता सोडले असते, केवळ तिच्या मित्राला मारहाण केली असती.’ फाशीच्या शिक्षेबाबत मुकेश म्हणाला की, “फाशीची शिक्षा मुलींसाठी धोका वाढवेल. आता जर एखाद्याने बलात्कार केला तर तो त्या मुलीला (जिवंत) सोडणार नाही, जसे आपण केले. तो तिला ठार करील.”