Nirbhaya Case : आता फाशी निश्चित ? निर्भयाचा गुन्हेगार मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

पोलीसनामा ऑनलाइन – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशसिंग याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की संबंधित कागदपत्रे राष्ट्रपतींकडे ठेवली गेली नाही याचा पुरावा नाही. मुकेश यांनी आपली दया याचिका फेटाळून लावण्याच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. मंगळवारी मुकेश याची वकील अंजना प्रकाश म्हणाल्या होत्या की, राष्ट्रपतींसमोर कागदपत्रे ठेवले गेले नव्हते, म्हणून दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा. मुकेश यांनी आपल्या वकिलाद्वारे सांगितले की, तुरुंगातच त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि त्याचा भाऊ रामसिंग याची हत्या करण्यात आली होती.

बुधवारी याप्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, स्वत: ला संतुष्ट करण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या सर्व कागदपत्रांवर नजर टाकली. गृहमंत्रालयाने सर्व कागदपत्रे पाठविली होती. मुकेश यांच्या याचिकेत कोणतीच गुणवत्ता नाही. यानंतर मुकेश यांची याचिका फेटाळून लावली.

निर्णय आल्यानंतर निर्भयाच्या आईने सांगितले की, आता मला पूर्ण न्याय मिळेल अशी आशा आहे. गुन्हेगार कायद्याचा गैरवापर करीत आहेत. मुकेशची याचिका फेटाळून लावल्यामुळे मला 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

पटियाला हाऊस कोर्टाने यापूर्वी चार जानेवारी दोषींना फाशी देण्याची तारीख २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निश्चित केली होती, परंतु त्यानंतर दोषी मुकेशसिंग यांनी दया याचिका दाखल केली होती.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी निर्भया दोषी मुकेशसिंग यांची दया याचिका फेटाळल्यानंतर कोर्टाने नवा डेथ वॉरंट जारी केला. चारही दोषींना आता 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा