निर्भया केस : नराधम पवन, विनय आणि अक्षय पुन्हा करणार ते काम, 3 तास वकिल AP सिंह यांच्याशी ‘मुलाखत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाचे दोषी पवन गुप्ताची राष्ट्रपतींद्वारे दया याचिका रद्द करण्यात आल्यानंतर आता त्याची सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याचा दावा आहे की दया याचिका रद्द करण्यात आल्यानंतर कायदेशीर पद्धतीने दोषींना देण्यात येणाऱ्या 14 दिवसांच्या कालावधी संबंधित नियमांचे उल्लंघन झालेले आहे. याचिका रद्द करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी डेथ वॉरंट जारी केल्याने त्यांच्या मानवाधिकाराचे हनन होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दोषींचे वकील एपी सिंह शुक्रवारी तिहार तुरुंगात पवनला भेटले. एपी सिंह यांच्या मते पवनने त्यांना दया याचिका रद्द करण्यात आल्याच्या सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यास सांगितले आहे.

पवन म्हणाला की, ज्या दिवशी राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका रद्द केली होती त्याच दिवशी तिहार तुरुंग प्रशासन दोषींच्या डेथ वारंटसाठी खालच्या न्यायालयात गेले होते. यामुळे याचिका रद्द करण्याच्या विरोधात अपील करण्याची संधी मिळाली नाही. पवनचे वकील एक – दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. तुरुंगात वकील एपी सिंह यांनी इतर दोन्ही आरोपी विनय आणि अक्षयची भेट घेतली.

तीन तास त्यांच्यात चर्चा सुरु होती, दोषी विनयने आपल्या वकीलांना एक अर्ज दाखल करण्यासाठी सांगितले आहे. त्याने सांगितले की निवडणूकीदरम्यान त्याची दया याचिका बेकायदेशीर पद्धतीने रद्द करण्यात आली होती. आचार संहिता लागू असल्याने त्यांची याचिका रद्द केली होती. दोषी अक्षयने देखील आपल्या वकीलांना सांगितले की त्याच्या दुसऱ्या दया याचिकेला लपवले जात आहे. एपी सिंह म्हणाले, ते यासंबंधित सर्व अर्ज न्यायालयात दाखल करणार आहेत.