निर्भया केस : दोषींची पुन्हा टळू शकते 1 फेबु्रवारीला दिली जाणारी फाशी, विनयनं दाखल केली दया याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला आणखी उशीर होऊ शकतो. फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी चार दोषींमधील एक विनयने नवी चाल खेळली आहे. विनयचे वकील एपी सिंह यांनी दया याचिका दाखल केली आहे. बुधवारी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आली. विनयची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

तर दोषी अक्षय आणि पवन यांच्याकडे अद्यापही क्युरेटिव्ह याचिकेचा पर्याय शिल्लक आहे. क्यूरेटिव्ह याचिका रद्द केल्यास राष्ट्रपतींकडे दया याचिका आणि ती ही फेटाळल्यास त्या विरोधात न्यायालयात आव्हान असे पर्याय त्यांच्याकडे शिल्लक आहेत. विनयची दया याचिका रद्द ठरवल्यास तो देखील मुकेश प्रमाणेच पुन्हा न्यायालयात या विरोधात आव्हान देऊ शकतो. त्यामुळे ही आता निश्चित आहे की 1 फेब्रुवारीला ठरलेली फाशी आणखी पुढे ढकलली जाऊ शकते.

मुकेशची याचिका फेटाळली –
सर्वोच्च न्यायालयाने दोषी मुकेशची याचिका फेटाळली आहे. राष्ट्रपतीद्वारे दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर त्याने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 2012 साली सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील दोषींना तीन दिवसांनी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे आणि तत्पूर्वी दोषींकडून फाशी टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

न्यायालयाने वकिलांचा तर्क फेटाळला –
न्यायालयाने सांगितले की दोषीने केलेला व्यवहार आणि कूरता पाहून त्याला दया दाखवली जाऊ शकत नाही. मुकेशच्या वकिलांचा तर्क न्यायालयाने फेटाळला. वकीलांनी त्यात म्हणले होते की राष्ट्रपतींनी दया याचिकेवर घाईत निर्णय घेतला.

न्यायालयाने वकिलांना सुनावले की राष्ट्रपतींनी घाईत निर्णय घेतला म्हणजे असे नाही की त्यांनी कोणताही विचार न करता निर्णय घेतला.

फेसबुक पेज लाईक करा