निर्भया केस : कोणाला फाशी द्यायची असेल तर त्यापेक्षा अधिक महत्वाचं काहीच असू शकत नाही, दोषी मुकेशच्या याचिकेवर CJI यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंह याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपली दया याचिका रद्द केल्याच्या विरोधात दाखल याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने दोषी मुकेशच्या वकीलांना सांगितले की त्यांनी शीर्ष न्यायालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांसमोर सोमवारी याचिकेचा उल्लेख करावा. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने मुकेश याच्या याचिकेवर सांगितले की जर कोणाला फाशी द्यायची असे तर त्यापेक्षा जास्त महत्वाचे आणखी दुसरे काहीही नाही.

2012 मध्ये घडले निर्भया प्रकरण –
2012 मध्ये पॅरामेडिकलच्या विद्यार्थीनीचा सामूहिक बलात्कार झाला होता आणि त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुकेश कुमार या दोषीची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळली होती. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या पीठाने सांगितले की जर कोणाला फाशी देण्यात येणार असेल तर त्यापेक्षा आधिक महत्वाचे दुसरे काही नाही. तसेच त्यांनी शीर्ष न्यायालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. या खंडपीठात न्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायाधीश सूर्यकांत देखील होते.

1 फेब्रुवारीला चारही आरोपींना फाशी –
निर्भयांच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. मुकेश याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर मुकेशने दया याचिका दाखल केली होती.

दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आदेश सुरक्षित –
दिल्लीच्या एका सत्र न्यायालयाने दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका राखून ठेवली आहे. या याचिकेत त्यांनी साक्षींच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी आरोप केला की साक्षीदारांना पहिल्यांदाच सांगण्यात आले होते की प्रश्नांना काय उत्तरं द्यावीत.