निर्भया केस : ‘प्रत्यक्षदर्शी’ एकमेव साक्षीदारानं दिली होती ‘ही’ साक्ष, ज्यामुळं चारही दोषींना 20 मार्चला होणार ‘फाशी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीच्या वसंत विहारमधील गँगरेपचा प्रत्यक्षदर्शी आणि निर्भयाचा मित्र अवनींद्र पांडेय गोरखपुर येथे राहणारा आहे. निर्भया कांडदरम्यान अवनींद्र तिच्यासोबत बसमध्ये होता. एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्याची या प्रकरणातील भूमिका सर्वात महत्वाची होती, आरोपींना फाशीपर्यंत पोहचवण्यासाठी त्याची साक्ष खुप महत्वाची ठरली आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लढणारा तिचा मित्र स्वत: एवढा खचला होता की, त्याला सावरण्यास कुटुंबियांना चार वर्षे लागली.

16 डिसेबर 2012 च्या रात्री निर्भया आपला मित्र वकिल भानू प्रकाश पांडेय यांचा मुलगा अवनींद्र याच्यासोबत बसमधून जात होती. यावेळी नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या. मोठ्या कालावधीपर्यंत अवनींद्र अज्ञातवासात जीवन जगला आणि अजूनही तो जीवन जगत आहे.

वडील भानू प्रकाश पांडेय घटनेचा उल्लेख होताच भावनिक होतात. त्यांचे म्हणणे आहे की, अवनींद्र ती रात्र अजून विसरलेला नाही. प्रत्येक क्षणी त्याला एक वेदना सतावत असते ती म्हणजे तो तिला वाचूव शकला नाही. त्यांनी सांगितले की, चारही आरोपींनी प्रथम त्यांना बसमध्ये लिफ्ट दिली आणि त्यांचे सामान लुटले. यानंतर दोघांना बेदम मारहाण केली आणि निर्भयावर सामुहिक बलात्कार केला. आरोपींनी प्रथम माझ्या मुलाचे कपडे काढून त्याला बसच्या बाहेर फेकले आणि नंतर निर्भयाला.

त्या नराधमांनी त्यांना रस्त्यावर यासाठी टाकले की, ते न मेल्यास थंडीने मरावेत. त्यानंतर जे घडले ते सर्व देशाला माहिती आहे. त्यांनी भावूक होऊन म्हटले की, कुणासाठीही ऐकणे आणि बोलणे सोपे असते, परंतु जी दुर्घटना झाली आणि त्या रात्रीबाबत माहिती मिळाली, तेव्हापासून आमची स्थिती काय आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. खुप प्रयत्न करून माझा मुलगा यातून सावरला आहे.

निर्भयाच्या मोरकर्‍यांचे वाचण्याचे सर्व पर्याय बुधवारी संपले आहेत. आज निर्भयाचे चारही गुन्हेगार अक्षय ठाकुर, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांच्या फाशीची ही चौथी तारीख आहे. 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता त्यांना फासावर लटकवण्यात येणार आहे.