निर्भया केस : फाशीची नवी तारीख निश्चित, अद्यापही दोषींकडे 2 पर्याय शिल्लक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील 4 ही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात कोर्टाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. त्यासाठी नव्याने डेथ वारंट जारी करण्यात आले आहे. परंतु अद्यापही 2 असे पर्याय आहेत ज्याव्दारे फाशीची शिक्षा पुन्हा टाळली जाऊ शकते.

पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी दरम्यान सरकारी वकीलांकडून सांगण्यात आले की तिन्ही दोषींची (अक्षय, विनय, मुकेश) दया याचिका रद्दबातल ठरवण्यात आली आहे. एक दोषी पवनची दया याचिका आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल होणे बाकी आहे.

सरकारी वकील न्यायालयात म्हणाले की, उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला कालावधी 11 फेब्रुवारीला समाप्त झाला आहे. सध्या कोणत्याही आरोपीची याचिका कोणत्याही न्यायालयात प्रलंबित नाही. त्यामुळे डेट वारंट जारी केले जाऊ शकते.

परंतु अद्यापही 2 पेच आहेत. ज्यामुळे फाशी टाळली जाऊ शकते. दोषी पवनने अद्याप आपला क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिकेचा पर्याय शिल्लक ठेवला आहे. दोषी पवनने फाशीपूर्वी बरेच दिवस आधी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली तर त्याची दिवशी त्याची याचिका रद्द होऊ शकते. परंतु फाशीच्या तारखेपूर्वी 29 फेब्रुवारीला त्याने याचिका दाखल केली तर सुनावणीला वेळ लागेल आणि 3 मार्चला होणारी फाशी टाळली जाईल.

याशिवाय पवनकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. राष्ट्रपतींकडून जर या निर्णय देण्यास उशीर झाला तर फाशी आणखी टळू शकते.

आम्ही अक्षयची दया याचिका दाखल करु इच्छितो – वकील
दोषीचे वकील एपी सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, आम्ही अक्षयची दया याचिका दाखल करु इच्छितो. दया याचिकेत पूर्ण दस्तावेज लावले नव्हते. अक्षयच्या आई-वडीलांनी दया याचिकेला अपूर्ण दस्तावेज लावले होते. जर न्यायालय आम्हाला परवानगी देईल तर आजच आम्ही अक्षयची स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु. तर पवनचे वकिल रवि काजी न्यायालयात म्हणाले की ते देखील क्युरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करु इच्छित आहे.

You might also like