निर्भया केस : 3 मार्चला सकाळी 6 वाजता चारही दोषींना एकाच वेळी फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात न्यायालयाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता एकाच वेळी फाशी देण्यात येईल. त्यासाठी नव्याने डेथ वारंट जारी करण्यात आले आहे.

निर्भयांच्या आई वडीलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की गुन्हेगारांविरोधात पुन्हा नव्याने डेथ वांरट जारी करण्यात यावे. यावर आज सुनावणी दरम्यान हे नवे डेथ वारंट जारी करण्यात आले.

“मी या निर्णयाने संतुष्ट आहे, देर है पर अंधेर नाही असे म्हणतात आणि आता न्यायालयाने पुन्हा डेथ वारंट जारी केले आहे”, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने सुनावणीनंतर दिली.

यापूर्वी न्यायालयाने दोषींना 22 जानेवारीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुन्हेगारांनी दया याचिका दाखल केली आणि न्यायालयात पुन्हा आव्हान दिल्याने ही फाशीची शिक्षा 1 फेब्रुवारीला देण्यात येणार असे निश्चित झाले होते. परंतु पुन्हा एका गुन्हेगार फाशीपासून कायदेशीर पळवाटा शोधत असल्याने 1 फेब्रुवारीला होणारी फाशी पुढील आदेशापर्यंत रोखण्यात आली होती.

त्यानंतर आज पतियाळा हाऊस कोर्टाने आज पुन्हा एकदा निर्भया प्रकरणीतील दोषींविरोधात डेथ वारंट बजावले आहे. 3 मार्चला सकाळी 6 वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात येईल. असे असेल तरी या तारखेला तरी फाशी निश्चित होणार का यावर प्रश्नचिन्ह आहेत. कारण निर्भयाचे दोषी नवनव्या कायदेशीर पळवाटा शोधत आहेत.

You might also like