निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर चढवणार ‘हे’ 2 जल्लाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कारातील चार दोषींना फाशी देण्यासाठी तिहार जेल प्रशासनाने उत्तर प्रदेशातील डीजी जेलमधून दोन जल्लादांची मागणी करण्यात आली आहे. तिहार प्रशासनाचे म्हणणे आहे की ४ लोकांना फाशी द्यावी लागेल, अशा परिस्थितीत दोन जल्लादांची गरज आहे.

तिहार प्रशासनाचे पत्र डीजी जेलला भेटले आहे, त्यानंतर डीजीने तिहार प्रशासनाला जल्लाद देण्याची तयारी दर्शविली आहे. मेरठ कारागृहात तैनात असलेला जल्लाद २० जानेवारीला तिहारवर रिपोर्ट करेल.

असे मानले जाते आहे की, दोषींना फाशी देणारा एक जल्लाद मेरठचा पवन जल्लाद देणारा असेल तर दुसऱ्या बाबत निर्णय होणे बाकी आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/