निर्भया केस : दोषींची आणखी एक ‘चाल’, सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणुक आयोगाकडे ‘अर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोशी फाशी टाळण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करीत असून दोषी विनय शर्माने आता आणखी एक उपाय शोधून काढला आहे. त्याचे वकील एपी सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. ज्यात म्हटले की, २९ जानेवारीला दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी जेव्हा विनय यांची दया याचिका फेटाळून लावण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस केली तेव्हा ते मंत्री नव्हते किंवा आमदार नव्हते.

दोषी विनय शर्माचे वकील एपी सिंह यांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांनी ३० जानेवारी रोजी व्हाट्सएपच्या माध्यमातून आपली सही पाठविली होती. अर्जामध्ये असे म्हटले आहे की, अश्या परिस्थितीत दया याचिका फेटाळून लावणे बेकायदेशीर आणि असंविधानात्मक आहे, कारण त्यावेळी दिल्लीत निवडणुकांसाठी आदर्श आचार संहिता सुरु होती. अर्जात, निवडणूक आयोगाने कायदेशीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

गुन्हेगाराने स्वत: ला जखमी केले :
दरम्यान, तिहार कारागृहात गुन्हा दाखल असलेल्या दोषी विनय कुमारने स्वत: ला जखमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विनय कुमारने स्वत: चे डोके भिंतीवर जाऊन आदळले. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेत विनय किरकोळ जखमी झाला आहेत.

३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशी :
दरम्यान ३१ जानेवारी रोजी मुकेश कुमार सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार (३१) या चार दोषींना पुढील आदेश येईपर्यंत खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. मात्र, या चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येईल. पटियाला हायकोर्टाने १७ फेब्रुवारीला नवीन डेथ वॉरंट देण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला. हे प्रकरण दिल्लीतील डिसेंबर २०१२ मध्ये एका २३ वर्षीय महिलेच्या बलात्कार आणि हत्येशी संबंधित आहे. दरम्यान, नुकत्याच कोर्टाच्या आदेशाबद्दल समाधान व्यक्त करत निर्भयाच्या आईने सांगितले की, मी समाधानी व आनंदी आहे. मला आशा आहे की अखेरीस दोषींना फाशी देण्यात येईल.