निर्भया केस : चारही दोषींच्या कुटुंबियांकडून भावनिक ‘साद’, राष्ट्रपतींना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  निर्भया केसमधील चारही दोषींच्या कुटुंबियांकडून एक नवी खेळी खेळण्यात आली आहे. आता चारही दोषींच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडे आपल्यासाठी इच्छामरणाची मागणी केली आहे. एकुण 13 लोकांनी राष्ट्रपतींकडे ही मागणी केली आहे. यामध्ये मुकेशच्या कुटुंबातील 2, पवन-विनयच्या 4-4 आणि अक्षयच्या कुटुंबातील 3 सदस्यांचा सहभाग आहे. परंतु, कायदेशीरदृष्ट्या या पत्राला काहीही अर्थ नाही आणि कायद्यात अशा मृत्यूची तरतूदही नाही.

निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला होणार फाशी

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या दोषींसाठी नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. दोषींना 20 मार्चला फाशी देण्यात येणार आहे.

निर्भयाच्या गुन्हेगारांना 20 मार्चला सकाळी साडेपाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. यापूर्वी कोर्टाने तीनवेळा डेथ वॉरंट जारी केले होते. यापूर्वी दोषींची फाशी तीनवेळा टळली आहे. दोषी शेवटच्या क्षणापर्यंत कादेशीर डावपेच खेळत होते. परंतु, पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर चारही दोषींचे कायदेशीर पर्याय संपुष्टात आले आहेत. यामुळे 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता देण्यात येणार्‍या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.