निर्भया केस : ‘हा’ जल्लाद मोडणार पणजोबांचा ‘विक्रम’, तिहार तुरूंगात चौघांना एकत्र लटकवणार फासावर

मेरठ : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना 22 जानेवारी रोजी तिहार जेलमध्ये फाशी दिली जाणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. सकाळी सात वाजता आरोपींना फासावर लटवकलं जाणार आहे. पवन जल्लाद ही कामगिरी पार पाडणार आहेत. जल्लादचं काम करणारी त्यांची ही चौथी पिढी आहे असंही म्हटलं जात आहे. वारशामध्ये कोणाला संपत्ती मिळते तर कोणाला काय मिळते, परंतु उत्तर प्रदेशातील मेरठमधील पवन जल्लाद यांना जल्लादाचे काम मिळाले आहे.

पवन जल्लाद यांची ही पिढी चौथी पिढी असून ते आयुष्यातील पहिली फाशी देण्याच्या तयारीत आहे. 1950-60 च्या दशकात या कुटुंबातले पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचं काम करत होते. आता त्यांचा पणतू म्हणजेच पिढीचे प्रमुख लक्ष्मण जल्लाद यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्याही मुलाचा मुलगा म्हणजेच पवन जल्लाद आहे जी त्यांची चौथी पिढी आहे. या कुटुंबातल्या लोकांना जल्लादचं कुटुंब म्हणून ओळखलं जातं.

पवन जल्लाद यांचा हा पहिलाच अनुभव
आजोबा कालू राम जल्लाद यांना पाच फाशींमध्ये पवन यांनी मदत केली आहे. पवन यांनी या 5 फाशींच्या दरम्यान फाशी देण्याच्या प्रक्रियेमधील सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले आहेत. पवन आता निर्भया प्रकरणातील 4 दोषींना फासावर लटकवणार आहे. पवन जल्लाद यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव असणार आहे.

‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एकत्र 4-4 आरोपींना फासावर लटकवणार’
याबाबत बोलतान पवन जल्लाद म्हणाले, “मी तयार आहे. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी एकावेळी एक किंवा दोन दोषींना फाशी दिली आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एकत्र चार-चार आरोपींना फासावर लटकवणार आहे.”

महत्त्वाची बाब अशी की, एकाच जल्लादने एकाच वेळी चार दोषींना फासावर लटवकण्याची घटना आजपर्यंत तिहार तुरुंगाच्याच नाही तर भारताच्या इतिहासातही घडली नाही. पवन जल्लाद यांनी तशी संधी मिळत आहे त्यामुळे ते खुश आहेत असे समजत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/