निर्भया केस : न्यायाधीशांनी दोषींच्या वकिलांना फटकारलं, म्हणाले – ‘तुम्ही आगी सोबत खेळताय’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया केसमधील चारही दोषींच्या फाशीला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सोमवारी कोर्टात अनेक तासांची दीर्घ सुनावणी झाली. या केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोषींचे वकिल एपी सिंह यांना चांगलेच फटकारले. जज धर्मेंद्र राणा म्हणाले, तुम्ही आगीशी खेळत आहात, तुम्हाला सावध राहावे लागेल.

न्यायालयाने क्यूरेटिव्ह आणि दया याचिका करण्यास झालेल्या उशीराबद्दल पवनचे वकील एपी सिंह यांना फटकारले. जज म्हणाले, कुणाकडूनही एकजरी चुकीचे पाऊल उचलले तर परिणाम तुमच्या समोर असतील. सावध राहा. कोर्टाने दोषी पवनचे वकिल एपी सिंह यांनी विनंती केली होती की, त्याने राष्ट्रपतींना दया याचिका पाठवली आहे. जोपर्यंत राष्ट्रपती यावर निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत न्यायालयाने डेथ वॉरंटवर स्थगिती आणावी.

पवनने सोमवारी सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पिटीशन फेटाळल्यानंतर ताबडतोब दया याचिका दाखल केली होती. दोषीचे वकिल एपी सिंह यांनी विनंती केली होती की, जोपर्यंत राष्ट्रपती निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत डेथ वॉरंटला स्थगिती द्यावी. फाशीला स्थगिती दिल्यानंतर निर्भयाची आई म्हणाली, शिक्षेला सतत स्थगिती दिल्याने यंत्रणेचे अपयश दिसून येत आहेत. आपली संपूर्ण यंत्रणा गुन्हेगारांची मदत करणारी आहे.

निर्भयाचा दोषी पवन गुप्ताची सुधारित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर सोमवारी पटियाला हाऊस कोर्टाने पवन आणि अक्षयची याचिका फेटाळली होती. या याचिकेत दोन्ही दोषींनी 3 मार्च सकाळी 6 वाजता होणार्‍या फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती, जी सत्र न्यायालयाने फेटाळली होती. परंतु, पवनची दया याचिका प्रलंबित असल्याने दोषींचे वकिल एपी सिंह फाशी टाळण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाले.